You are currently viewing ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, आयोजित अन्नदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, आयोजित अन्नदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी, बांदा व कुडाळ तसेच, ‘वाव किड्स रायन प्री स्कूल ‘ , सावंतवाडी संस्थेने अन्नदान शिबिराचे  आयोजन केले होते.

ग्लोबल स्कूल’ सावंतवाडी , बांदा व कुडाळ तसेच, ‘ वाव किड्स रायन प्री स्कूल ‘, सावंतवाडी , शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ यांनी ‘ माऊली कर्णबधिर, मतिमंद विद्यालय’ कोंडूरे व वेद पाठशाळा, सावंतवाडी येथे ‘ थोडे द्या, खूप मदत करा’ असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी बऱ्याच पालकांनी किराणावस्तूंचे दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

या अन्नदान शिबिराच्या निमित्ताने पालकांनी तांदूळ- १६० किलो, गहू – १०० किलो, साखर – ४५ किलो, पोहे – ३५ किलो, कडधान्य – ४० किलो, गोडतेल – २० लिटर, बिस्कीट पुडे – १०० नग, रवा – ५ किलो, गहू पीठ – ३५ किलो, डाळ – ८ किलो, मीठ – ५ किलो, कोलगेट – १० नग, नारळ – ५ नग हे खाद्यपदार्थ देऊ केले. व संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या शिबिराद्वारे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून मोलाचे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा