You are currently viewing इन्सुलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी निपाणी येथून नापता

इन्सुलीतील महाविद्यालयीन विद्यार्थी निपाणी येथून नापता

सावंतवाडी

निपाणी येथील केली बागेवाडी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी असलेला रोहन सुरेश राठोड ( १९, रा. खामदेव नाका इन्सुली ) हा १६ फेब्रुवारी रोजी निपाणी बस स्टॅन्डवरून नापता झाल्याची खबर त्याचे वडिल सुरेश पोमू राठोड यांनी सावंतवाडी पोलिसात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हरवलेला रोहन सुरेश राठोड हा निपाणी येथे के. एल.ई भागेवाडी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी त्याचे काका रविकुमार पोमु राठोड यांचेकडे राहण्यासाठी असतो. सुमारे एक महिन्यापूर्वी तो इन्सुली शेर्ला, खामदेव नाका, ता. सावंतवाडी येथे आपल्या आईवडीलांना भेटण्यासाठी व पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी मुळ गावी आला होता .त्यानंतर कॉलेजमध्ये त्याचे काही काम आहे असे सांगून तो १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास सावंतवाडी बसस्थानक येथून निपाणीकडे जाण्यासाकरीता कोल्हापूर बसने प्रवासासाठी निघाला. त्यावेळी त्याची आई रेवम्मा ही त्याला सोडवण्यासाठी सावंतवाडी बसस्थानकपर्यंत आली होती. दुपारी १ वा. चे सुमारास तो निपाणी येथे पोहोचणार होता. पोहोचण्यापूर्वी १२.५० वा. चे सुमारास त्याने त्याची आई रेवम्मा हीला मोबाईल कॉल करून मी निपाणीमध्ये आलो १० मिनिटात उतरणार आहे.’ अशी माहीती दिली होती. परंतू तो तेथे न पोहचलाच नाही. तसेच त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता.सदर नापत्ता मुलाचा मोबाईल बंद झाल्यापासून कुटुंबातील सदस्यांनी त्याचा त्याचे कॉलेज, सर्व नातेवाईक तसेच मित्र मंडळीकडे शोध घेतला. चौकशी केली मात्र सदर युवक न सापडल्याने अखेर त्याचे वडिल सुरेश राठोड यांनी सदर नापत्ताची खबर दिली. त्याप्रमाणे सावंतवाडी पोलिसांत नापत्ता दाखल केलेला आहे. तरी, यातील नापत्ता युवक कोणाला आढळून आल्यास सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − one =