You are currently viewing रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त सहभाग; ६५ रक्तदात्यांचे रक्तदान

रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त सहभाग; ६५ रक्तदात्यांचे रक्तदान

कणकवली :

 

कणकवली शहर भाजपतर्फे येथील नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबीराला उत्स्फूर्त सहभाग लाभला यामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कमतेकर, अभिजित मुसळे, शिशीर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर, सुशील पारकर, जावेद शेख, राजा पाटकर, संदीप राणे, महेश अंधारी, नंदू वाळके, आशिष वालावलकर, डॉ. प्राची तनपुरे, डॉ. अमित आवळे, परिचारिका प्रांजली परब आदी उपस्थित होते. या शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना भेट वस्तू व प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा