You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव सिनेमा थिएटर शेजारी खोपित जुगाराची बैठक

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव सिनेमा थिएटर शेजारी खोपित जुगाराची बैठक

*सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव सिनेमा थिएटर शेजारी खोपित जुगाराची बैठक*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांचे खेळ मात्र संपता संपत नाहीत, तरुणांना देशोधडीला लावणारे, सधन कुटुंबाला निर्धन करणारे जुगार, मटका, दारू आदी अवैद्य व्यवसाय गावोगावी मोठ्या दिमाखात सुरू आहेत. बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात तरुण मुले, घरातील कर्ता पुरुष हाती पैसा नसला तर घरातील ऐवज विकून गहाण ठेऊन जुगाराच्या मैफिलीत सामील होतो आणि होत्याचे नव्हते होते.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील थिएटरच्या शेजारी असलेल्या खोपित गेले 15 दिवस जुगाराच्या मैफिली रंगत आहेत. ढोर मेल्यावर गिधाडे जमा होतात तसे जिल्हाभरातील अनेक जुगारी या जुगाराच्या मैफिलींवर येऊन पैशांचा पाऊस पाडतात. कोलगाव येथील साउळ, कुट्टी, आणि दारू धंद्यात गोंधळ घालणारे संजे हे या बैठकीचे तक्षमदार आहेत.
जिथे कुठे जुगाराच्या बैठका बसतात तेथील बिट अंमलदारांना हाताशी धरून अन्यथा खाकी गर्दीच्या डोळ्यात धूळ फेकून बिनधास्तपणे हे जुगाराचे खेळ सुरू असतात. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे जातिनिशी लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा