You are currently viewing वेंगुर्ले शहरात पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजरात नववर्षाचे स्वागत..

वेंगुर्ले शहरात पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजरात नववर्षाचे स्वागत..

वेंगुर्ला :

वेंगुर्ला शहरात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, ढोल ताशे, सनई यांच्या निनादात आज हिंदू धर्माभिमानी मंडळी यांच्या तर्फे काढण्यात आलेली स्वागतयात्रा लक्षवेधी ठरली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिदू धर्माभिमानी मंडळी यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. यात शेकडो हिंदू धर्माभिमानी सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी केली.

स्वागतयात्रेच्या प्रारंभी नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगाराई नष्ट होवो यासाठी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेऊन सांगणे करण्यात आले. त्यानंतर स्वागतयात्रेला सुरुवात झाली. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता झाली. या स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी भजनाचा फेर धरला. तर नित्यानंद वेंगुर्लेकर याने अयोध्येच्या रामाची केलेली वेशभूष लक्षवेधी ठरली. तसेच विविध वेशभूषा केलेली लहान मुले या यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी सर्वांनी एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा