You are currently viewing भारताचा रशियामध्ये डंका..

भारताचा रशियामध्ये डंका..

दोडामार्ग तालुक्यातील कोलझरच्या उर्वी परबचे एमबीबीएस परीक्षेत यश

दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील उर्वी जगन्नाथ परब हिने एमबीबीएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून रशियामध्ये भारताचा झेंडा फडकवला. उर्वी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी. वडील जगन्नाथ परब भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये रिअॅक्टर एक्झामिनेशन  डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल सुपरवाझर म्हणून काम करायचे. तर आई अरुंधती परेल येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग इन्चार्ज म्हणून काम करायच्या. उर्वीच एमबीबीएस व्हायच स्वप्न साकार करण्यासाठी दोघांनीही आपली सर्व कमाई तिच्या शिक्षणासाठी खर्च केली.  उर्वीनेही अथक मेहनत करुन आपले स्वप्न प्रत्यक्षात आणले. रशिया मधील रिझान विद्यापीठातून तिने एमबीबीएसचा सहा वर्षांचा अभ्यासक्रम (सन२०१६ ते २०२१)यशस्वीरित्या पूर्ण करुन ती एमबीबीएस उत्तीर्ण झाली. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + ten =