You are currently viewing इतिहासाच्या तीन पुस्तकांवर बंदी

इतिहासाच्या तीन पुस्तकांवर बंदी

 

पंजाब शालेय शिक्षण मंडळाने शीख इतिहासाशी निगडित माहितीमध्ये कथितपणे फेरफार करून त्यात बदल करून ते सादर केल्याप्रकरणी इतिहासाचे तीन पुस्तकांवर बंदी घातली आहे. मंजीत सिंह सोढी यांचे “मॉडर्न एबीस ऑफ हिस्टरी ऑफ पंजाब” महिंदरपाल कौर यांच्याकडून लिहिण्यात आलेले “पंजाब का इतिहास” आणि इयत्ता बारावीचे एम एस माने यांचे “पंजाब का इतिहास” या तीन ही पुस्तकांवर बंदी घालण्यात आली आहे.

पंजाबचे शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हेयर यांनी रविवारी सांगितले की, “शीख इतिहास आपल्या सर्वांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना शीख गुरूंचा, शीख जगताचा आणि पंजाबच्या इतिहासाची माहिती करून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.” इयत्ता 12वीच्या ‘हिस्ट्री ऑफ पंजाब’ या पुस्तकात शिखांच्या इतिहासाशी संबंधित खोटी तथ्ये मांडण्यात आली होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेनुसार लेखक आणि प्रकाशकांवर कारवाई करून पुस्तकांच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा