You are currently viewing मालवण परिसरात वृक्षारोपण ..

मालवण परिसरात वृक्षारोपण ..

मालवण :

नॅशनल युनियन ऑफ सीफेसर्स ऑफ इंडिया ही १२५ वर्षांची नाविकांची संघटना त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या नात्याने ‘न्युसी संकल्प’च्या अंतर्गत ‘न्युसी सदाबहर’च्या माध्यमातून पाच वर्षांत दहा लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्गातील नाविकांच्या वतीने वृक्षारोपण सोहळा उपक्रम नुकताच  मालवण आणि आजूबाजूंच्या गावांमध्ये पार पाडला.

कोळंब येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास यावेळी मुंबई येथील अझा कंपनीत कार्यरत असलेले देवेन पाटकर, विपुल केळुसकर, चेतन भोजने यांच्यासह स्थानिक रहिवासी शेखर कांदळगावकर, दादा कांदळगावकर, वासुदेव पराडकर, रवींद्र धुरी आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा