You are currently viewing आजगाव साहित्य कट्ट्याचा विसावा कार्यक्रम

आजगाव साहित्य कट्ट्याचा विसावा कार्यक्रम

गोवा येथील साहित्यप्रेमी सुभाषजी शेटगावकर यांची प्रमुख उपस्थिती

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा विसावा कार्यक्रम रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात गोवा येथील साहित्यप्रेमी सुभाषजी शेटगावकर यांना निमंत्रित केले आहे. सुभाष जी शेटगावकर हे तोरसे गोवा येथील शिक्षक असून ३८५ कार्यक्रम केलेल्या ‘साहित्य संगम’ या मांद्रे-गोव्यातील साहित्य संस्थेचे अध्यक्ष आहेत.
या कार्यक्रमात ते कै. रणजित देसाई लिखित ‘हे बंध रेशमाचे’ या नाटका संबंधी विवेचन करतील.
त्यांचे विचार ऐकण्यासाठी व चर्चा करणेसाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा