You are currently viewing खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक

खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक

कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी आरटीपीसीआर लॅबना कोविड टेस्ट करण्यासाठी राज्य शासनाने 800 रु दर ठरवून दिला असताना काही खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 1200 रु आकारले जात असून जनतेची लुबाडणूक करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे नियमबाह्य असल्याने यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी काहीजण जनतेची लुबाडणूक करत आहेत.शासनाने खाजगी आरटीपीसीआर लॅबना 800 रु दर ठरवून दिला आहे. त्यामुळे जनतेला होणारा आर्थिक भुर्दंड कमी केला आहे. मात्र सिंधुदुर्गातील काही लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी दर वाढवून नियमबाह्य रित्या 1200 रु. आकारले जात आहेत. याकडे सुजित जाधव यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले असून गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eight =