You are currently viewing योग करा आणि निरोगी रहा-डी‌.एस.पाटील

योग करा आणि निरोगी रहा-डी‌.एस.पाटील

योग करा आणि निरोगी रहा-डी‌.एस.पाटील

वैभववाडी

सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी व्यायामाबरोबरच योग सुद्धा महत्वाचा आहे. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक तंदुरुस्तीसाठी योगा आणि प्राणायाम करा आणि निरोगी रहा असे आवाहन नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा योगशिक्षक श्री.डी.एस.पाटील यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना‌,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एनसीसी आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ जून हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक श्री.डी.एस.पाटील, प्रा.एस.एन.पाटील, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.ए.चौगुले, प्रा.एस.सी.राडे, एनसीसी प्रमुख प्रा.रमेश काशेट्टी उपस्थित होते.
यावेळी श्री.डी.एस.पाटील यांनी सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम योगासने यांची माहिती व प्रात्यक्षिक सादरीकरण केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनी योग प्राणायाम केला पाहिजे. दररोज आणि नियमबद्ध योगा केल्यास त्याचा फायदा सर्वांना होणार आहे असे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.एम.ए.चौगुले यांनी व्यक्त केले तर प्रा.एस.एन. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 9 =