You are currently viewing उद्यान महाविद्यालय मुळदे येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

उद्यान महाविद्यालय मुळदे येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

कुडाळ :

 

दि.२१ जून हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. उद्यान महाविद्यालय मुळदे येथे हा दिवस अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तज्ञ म्हणून कुडाळ येथील प्रथितयश आयुर्वेदिक वैद्य डॉ. प्रियांका माधव पटाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी डॉ. प्रियांका पटाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी प्रास्ताविकामध्ये योग दिनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रियांका पटाडे यांनी उपस्थित प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना योग शास्त्र, त्याचे दैनंदिन जीवनातील महत्व इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली व विविध आसने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सर्वांकडून करून घेतली. सर्व उपस्थितांनी सर्व आसने अतिशय तन्मयतेने केली.सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी आयुर्वेदाचार्य डॉ. प्रियांका पटाडे मॅडम राबवित असलेल्या योग चळवळी बद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयामार्फत डॉ. प्रियांका पटाडे मॅडम यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.हळदवणेकर सर यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी,अधिकारी कर्मचारी यांनी नियमित योग करून आपले शरीर व मन सुदृढ ठेवावे व युवा पिढीने योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून अंगिकारला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्वाना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =