You are currently viewing सर्व श्रमिक संघ करणार प्रशासनाविरोधात थाळी वाजवा आंदोलन

सर्व श्रमिक संघ करणार प्रशासनाविरोधात थाळी वाजवा आंदोलन

इचलकरंजी

इचलकरंजी येथील सर्व श्रमिक संघाच्या वतीने नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी प्रशासनाच्या विरोधात मंगळवार २१ जून व बुधवार २२ जून या दोन दिवशी थाळी वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे.यामध्ये नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन नगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मलाबादे चौकात करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोना महामारीच्या काळात इचलकरंजी शहरातील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावले आहे.असे असूनही ६८ कर्मचाऱ्यांन आठ महिन्यांची सुमारे १६ लाख ३२ हजार रुपयांची कोरोना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही.याबाबत इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून टाळाटाळ करत कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेत मानधन व मोबाईल रिचार्जची रक्कम मिळत नाही.याशिवाय सीबीई उपक्रमाची रक्कम व अंगणवाडी इमारतीचे भाडेची रक्कम वेळेत मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.यासाठी वारंवार मागणी करुनही याकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.याच अनुषंगाने सर्व श्रमिक संघाच्या वतीने मंगळवारी नागरी आरोग्य प्राथमिक केंद्र कर्मचाऱ्यांचे नगरपालिका प्रवेशद्वारासमोर व बुधवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मलाबादे चौकात थाळी वाजवा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =