चराठे नंबर १ शाळेचा स्तुत्य उपक्रम…

चराठे नंबर १ शाळेचा स्तुत्य उपक्रम…

सावंतवाडी

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे नंबर १ शाळेचा स्तुत्य उपक्रम येथील शाळेतील इयत्ता तिसरी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी घरी राहून चं निसर्गातील पाने फुले या सारख्या वस्तूंचा वापर करून वेकवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण अशा रांगोळ्या काढून एक आगळावेगळा उपक्रम केला. मुलांच्या अंगच्या गुणांना तसेच मुलांच्या नवनिर्मिती व विचारशक्ती ला चालना देण्यासासाठीस या उपक्रमाचे आयोजन केल्याचे शाळेतील मार्गदर्शक शिक्षक बापूशेट कोरगावकर व जयश्री पेडणेकर यांनी माहिती दिली. या उपक्रमाचे, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, मुख्याध्यापक वर्षा देसाई, सहशिक्षक तसेच पालकांनी प्रशंसा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा