महावितरणने कोणाच्याही घरातील, दुकानातील वीज जोडणी कापल्यास महावितरणची तार कापू

महावितरणने कोणाच्याही घरातील, दुकानातील वीज जोडणी कापल्यास महावितरणची तार कापू

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा इशारा

मालवण

कोरोना पार्श्वभूमीवर लाॕकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वीज वितरण कंपनीने ग्राहकांना मीटर रीडींगद्वारे वीजबील न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची वीजबीले येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून होत आहेत. लोकांचे धंदे अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या.असे असताना कोणाच्याही घरातील तसेच दुकानातील वीज जोडणी कापणी केल्यास महावितरणची तार कापू असा इशारा मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिला आहे . महावितरणने वीज खंडित करण्या बाबत घेतलेल्या धोरणाबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूर कर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची मालवणात भेट घेतली.यावेळी तालुका सचिव विल्सन गिरकर, उपतालुका अध्यक्ष उदय गावडे, मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर मनविसे शहर अध्यक्ष साईराज चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी चर्चा करताना लाईट बिल आता कोरोना पेक्षाही लोकांना भयंकर वाटायला लागला आहे लोकांकडे पैसे नाहीत आणि दुप्पट-तिप्पट बिल वीज वितरण आकार करत आहे त्याला काही संदर्भ आहे का लोकांना इतके बील का आकारले जात आहे असे सवाल उपस्थित होत आहेत.लाईट बिल योग्यप्रकारे द्या आणि कुठल्याही ग्राहकांची वीज जोडणी खंडित करू नका नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरणची तार कापेल असा इशारा अमित इब्रामपूरकर यांनी वीज अधिकाऱ्यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा