You are currently viewing कोळेकर कुटुंबीयांसाठी क्रेडाइकडे मदतीची हाक

कोळेकर कुटुंबीयांसाठी क्रेडाइकडे मदतीची हाक

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन

सावंतवाडी

सावंतवाडीतील बॅड बॉईजचा खेळाडू तान्या कोळेकर याच्या कुटुंबासाठी घर बांधून त्यात आवश्यक त्या सोई सुविधा पुरवण्यासाठी क्रेडाईच्या सर्व सदस्यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी क्रेडाई संघटनेकडे केले आहे.

कोळेकर कुटुंब गेली अनेक वर्ष सावंतवाडी शहरामध्ये हालाखीचे जीवन जगत आलेले आहेत. त्यांच्या या परिस्थितीवर मात करून त्यांना चांगले आसरा देण्यासाठी रवी जाधव यांच्या सामाजिक बांधिलकी संघटनेतर्फे नवीन छप्पर घालण्याचे काम हाती घेतले. परंतु काम करत असताना हे घर फार कमकुवत असल्यामुळे भिंती उभारणे तसेच अन्य स्वरूपाचं काम व पर्यायाने खर्च देखील वाढत गेला. मात्र, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध झालेला नसल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी क्रेडाई या बांधकाम व्यवसायातील संघटनेकडे आवाहन केले आहे.

सावंतवाडी शहरात क्रेडाइ ही बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संघटना आहे. शहरातील अनेक बिल्डर्स हे या संघटनेचे सदस्य असून यांची जी संघटना बिल्डर व्यवसायिकांनी अनेक टॉवर्स उभे करून शहरातील अनेक लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यातच या गरीब कुटुंबाला आसरा व सुविधा देण्यासाठी क्रेडाई संघटनेच्या सदस्यांनी मनापासून हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =