You are currently viewing आर्थिक दुबल घटकासाठी 11 वी प्रवेशामध्ये आरक्षणाचे लाभ देण्याचे निर्देश

आर्थिक दुबल घटकासाठी 11 वी प्रवेशामध्ये आरक्षणाचे लाभ देण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी

11 वी प्रवेशासाठी अर्थिक दुबर्ल घटकातील दुबल घटकाना आरक्षणाचा लाभ देण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी निर्देश दिले आहेत. याबाबत कार्यवाहीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ माध्यमिक शाळा यांना पत्रव्दारे कळविले आहे.

            पत्रकात पुढील प्रमाणे सुचनादेण्यात आल्या आहेत.

1)सर्व माध्यमिकांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील इ.10 वी परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी व या शैक्षणिक वर्षात इ.10 वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी यांना Ews या संवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येईल. यासाठी या संवर्गातील लाभार्थ्यांनी इ.11 वी प्रवेशासाठी प्रवेश अर्ज दाखल करताना EWS प्रवेश  मागणीचा स्पष्ट उल्लेख करावा शासन निर्णय दि. 12/02/2019 नुसार तहसिलदार यांचेकडे EWS.

दाखत्यासाठी अर्ज करावा. तहसिलदार यांचेकडील EWS दाखला प्राप्त करून तो अर्जासोबत जोडावा.

 2) याबाबतचा प्रसार, प्रचार व्हावा EWS संवर्गातील विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळावी यासाठी शाळांनी त्यांच्या नोटीस बोर्डावर या विषयाबाबतची ठळक माहिती प्रसिद्ध करावी. तसेच ही माहिती विद्यार्थी, पालक, यांच्या WhatsApp समुह, स्थानिक ई-मिडीया यांच्यामार्फत विद्यार्थी व पालकांना कळेल अशा पद्धतीने प्रसिद्धी द्यावी.

3) उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यानी प्रवेशप्रक्रियावेळी EWS संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना याबाबत आवश्यक ती माहिती द्यावी व यासाठी सहकार्य करावे. पात्र लाभार्थ्यांना EWS संवर्गातील प्रवेशाचा लाभ प्रवेश प्रक्रियेतील कोट्यानुसार उपलब्ध करून द्यावा.

 4) इ.12 वीमध्ये शिकत असलेल्या व इ. 12 वी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या यंत्रणेमार्फत पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी EWS संवर्गातून पात्र लाभार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करावे.

5) आपल्याकडील या संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना व पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे 16) NMMS परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ होण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =