You are currently viewing भाविकांचे श्रद्धास्थान; शिवकालीन श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव

भाविकांचे श्रद्धास्थान; शिवकालीन श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव

रांगणा गडाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य नारुर (ता.कुडाळ) येथील श्रीदेवी महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. सिंधुदुर्गातूनच नव्हे तर गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भाविक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती दर्शवितात.

शिलाहारराजे तसेच विक्रमादित्य चालुक्य राजे यांचे पूर्वकालीन हे देवस्थान असून मुसलमानी अंमल, श्री शिवछत्रपतींचा हिंदवी स्वराज्य अंमल, करवीर छत्रपतींचा अंमल तसेच सावंतवाडीकर सावंत भोसले सरकारचा अंमल या भागावर पूर्वी असल्याने गडावरील किल्लेदार नाईक-निंबाळकर यांच्याकडून तसेच सावंतवाडीचे सावंत भोसले सरकारकडून या देवीला इनाम जमिनी मिळाल्या. इ.स. १६५९ च्या सुमारास आनंदवन भुवन हिंदवी स्वराज्य निर्माते श्री शिवछत्रपती महाराज रांगणा किल्ल्यावरून सिंधुदुर्ग राजापूरकडे जाताना श्री देवी चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन गेले असल्याचे जुन्या जाणत्या मंडळींकडून सांगण्यात येते. इ. स.१८४८ पर्यंत रांगणा किल्ला भरभराटीस असतेवेळी नारूर गावी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे करवीर निवासीनी “अंबाबाई” प्रमाणेच नारूर निवासिनी “महालक्ष्मी जगदंबा” म्हणून हे देवस्थान भरभराटीस होते.१८४८ मध्ये इंग्रज सरकारने रांगणागड “निर्मनुष्य” करण्यासाठी सक्तीने गड खाली करून घेतला. त्यामुळे नारूर गावची बाजारपेठ बंद पडली. ही बाजारपेठ सुमारे ९०० वर्षांपूर्वीची जुनी होती.

सध्या हे देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर यांच्या देखरेकीखाली असल्याने, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नारूर या देवस्थानचे कामकाज पाहते.
राजा महामंडलेश्वर भोज दुसरा शिलाहार शाखेतील शेवटचे राजे, याने इ.स.११८७ साली रांगणा गडाची याची निर्मिती केली. हे शिलाहार राजे महालक्ष्मीचे भक्त होते. ५ सप्टेंबर १६६६ मध्ये राजमाता जिजाबाईंनी हा गड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स.१६७०-७१ मध्ये किल्ल्याच्या डागडुजीसाठी सहा हजार होण खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे. रांगणागड उतरल्यानंतर नारूरच्या श्री देवी महालक्ष्मीला छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक होऊन मालवणच्या सागरी किल्ल्यांना जायला निघायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या भूमीस पदस्पर्श झाला आहे.

या रांगणा गडाच्या पायथ्याशी “नारूर कर्याद नारूर” एक गाव वसले असून या गावात श्री देवी महालक्ष्मी हे प्रमुख ग्रामदैवत आहे. फार वर्षांपूर्वी श्री देव लिंगेश्वर हे नारूर गावचे ग्रामदैवत होते. परंतु कालांतराने श्री देवी महालक्ष्मीला ग्रामदेवता मानले जाऊ लागले. या देवीची पूजा अर्चा ब्राह्मणाकरवी केली जाते.

त्या काळात नारूर गावात वैश्य समाजाची वस्ती जास्त असल्याने तसेच त्यांची आर्थिक बाजू भक्कम असल्याने गावकऱ्यांनी त्यांना मान देऊन सर्व अधिकार त्यांनाच दिले. त्यानंतर सर्व उत्सव तसेच सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम या श्री देवी महालक्ष्मी मंदिरात साजरे केले जाऊ लागले. यापूर्वी सर्व उत्सव श्री देव लिंगेश्वर या मंदिरात साजरे केले जात होते. पूर्वी नारूर गावचे ग्रामदैवत “लिंगेश्वर” हे होते. हे मंदिर सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे आहे.

पूर्वी श्री देवी महालक्ष्मी मंदिराचे स्थान हे गायमुख येथे होते. तिथे या मंदिराचे काही अवशेष व जीर्ण झालेल्या मुर्त्या सापडल्याचे गावचे ज्येष्ठ रहिवासी कै. गणपत सखाराम नाखरे यांच्याकडून ऐकण्यात आले होते. सध्या या श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराची देखभाल गावाच्या राठीचे गावकर, बहुमनाकरी आणि गावचे ग्रामस्थ करतात.


 

*श्री देवी महालक्ष्मी नारुर वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा !*💐💐

 

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. केशव उर्फ दीपक नारकर* 

अध्यक्ष, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नारूर

चेअरमन – कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ, कुडाळ

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. दिपक म्हाडेश्वर*

नगरसेवक म्हापसा, म्हापसा नगरपालिका

संचालक, महालक्ष्मी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नारूर

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. अरविंद सावंत* 

शासकीय ठेकेदार, नारूर

8698763646

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*सौ. वैष्णवी विजय मेस्त्री*

सरपंच, ग्रामपंचायत नारूर क नारूर

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*महालक्ष्मी किराणा जनरल स्टोअर्स*

तळेकर बंधू

नारूर, कुडाळ

श्री. आबा तळेकर, नारूर

श्री. विनायक तळेकर, नारूर

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. प्रकाश मोर्ये*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, भाजप

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. महेश पाटील*

वनपाल, गोठोस

—————————————–

🌹शुभेच्छुक 🌹

 

*सौ. सुप्रिया तांबे* 

सदस्य – ग्रामपंचायत नारूर क नारूर

—————————————-

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. दिगंबर गावडे*

सदस्य – ग्रामपंचायत नारूर क नारूर

—————————————–

🌹शुभेच्छुक 🌹

 

*श्री. विजय लक्ष्मण मयेकर* 

सदस्य – ग्रामपंचायत नारूर क नारूर

शिक्षक – कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज

अध्यापक संघ – कार्यवाह

क्रीडा संघ उपाध्यक्ष, सहसचिव

सामजिक कार्यकर्ते

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा