You are currently viewing मसुरे गावचे सुपुत्र दीपक पेडणेकर यांना जि. प. आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

मसुरे गावचे सुपुत्र दीपक पेडणेकर यांना जि. प. आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

मालवण :

मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी दीपक पेडणेकर याचा जिल्हा परिषद मधील त्याच्या आदर्श कार्याचा गौरव म्हणून गुणवंत कर्मचारी पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कापडणीस, वित्त अधिकारी श्रीमती वल्लरी गावडे , कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर , सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री. नाईक , पाणी स्वच्छता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ठाकूर, शिक्षणाधिकारी श्री धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद मधील अतिशय चांगल्या अशा कामाची जिल्हा प्रशासनाने दाखल घेऊन दीपक पेडणेकर याचा आदर्श गुणवंत जिल्हा परिषद कामगार पुरस्कार देऊन गौरव केला. यापूर्वी दीपक पेडणेकर यांच्या कामाची दखल प्रशासनाने घेऊन त्याला वेळोवेळी अनेक पुरस्काराने सन्मानित केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा