You are currently viewing जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा चे आयोजन

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

सन 2022-23  या वर्षी सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा 61 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो फुटबॉल कप सुबज्युनियर / ज्युनियर क्रीडा स्पर्धा या खेळाच्या स्पर्धांच्या आयोजन करण्यात येत असून या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर ते 17 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत नीव दिल्ली येथे आयोजित होणार आहे. जिल्हस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी  विद्या शिरस यांनी दिली आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. वयोगट 14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) 1 जानेवारी 2009 रोजी  किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. जे संघ  स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी  नोंद घ्यावी व आपला फुटबॉलच्या संघास स्पर्धा ठिकाणी उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 12 =