You are currently viewing आचिर्णे येथे कृषी दिन उत्साहात साजरा

आचिर्णे येथे कृषी दिन उत्साहात साजरा

वैभववाडी

आज दिनांक १ जुलै रोजी कृषी महाविद्यालय सांगुळवाडी केंद्र आचिर्णे येथिल कृषी विद्यार्थ्यांनाच्या वतीने यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग तालुका वैभववाडी कडुन प्रकाश पाटील (वनपाल), विद्या जाधव (वन रक्षक) व तात्या धवल (वनमजूर), आचिर्णे ग्रामपंचायत सरपंच रुपेश रावराणे , यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक कारेकर सी वाय, इतर शिक्षक व कृषी विद्यार्थी उपस्थित होते
महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्रि तथा महाराष्ट्रतील हरितक्रांती चे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करूण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर मान्यवरांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कृषी दिनाचे महत्त्व व्यक्त करत यशवंतराव चव्हाण विद्यालयातील ३ विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले त्यांची नावे पुढील प्रमाणे श्रेया शेळके, स्नेहा घेरडे व सानिया सुतार. या मनोगतानानंतर कृषी महाविद्यालय सांगूळवाडी मधील आदित्य कोकरे याने शेती मधील आधुनिक तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली.
त्यानंतर विद्यालयाचे ज्यु. तुळसाकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शेती कडे वळण्याचा व मातीशि कृतघ्न राहण्याचा सल्ला दिला या माहितीपूर्ण मनोगता नंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या नंतर मनोगत केलेल्या ३ विद्यार्थिनींना भेट वस्तु देऊन त्यंचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी सम्मेद खानावळे यानी केले.
त्यानंतर सर्वांच्या उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाची संगता प्रभात फेरी ने करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला
या कार्यक्रमासाठी उपस्थीत असलेले, कृषी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
सम्मेद खानवळे (कृषी विद्यार्थी प्रतिनिधी केंद्र आचिर्णे ), शिवप्रसाद देवकर, आदित्य जाधव,सत्यजीत शेळके, श्रीनाथ जाधव, हर्षल सोनवणे, सुयश पवार, मनोज शिंदे, आदित्य कोकरे, जतिन पांचाळ आणि प्रसाद शिळीमकर होते.
यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे शिक्षकवृंद- कारेकर सी वाय (मुख्याध्यापक), देवकर टी एम् , तुळसकर एस् एम् (श्री.), तुळसकर एस् एम् (ज्युनियर), पाटील एस के, सावंत जी जे, रावराणे ए बी, घेरडे आदि उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =