You are currently viewing अग्निपथ भरती योजना..

अग्निपथ भरती योजना..

तरुणांना शॉर्ट टर्मसाठी लष्करात जाण्याची संधी

 

देशातील तरुणांना शॉर्ट टर्मसाठी लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ भरती योजनेची (Agnipath Bharati Yojana) घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत देशातील तरुणांना शॉर्ट टर्मसाठी लष्करात (Indian Army) जाण्याची संधी मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. यावेळी तिन्ही दलांच प्रमुख आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशात गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. लष्कराला जगातील सर्वोत्तम बनवण्यासाठी अग्निपथ योजना आणत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसंच देशाची सुरक्षा व्यवस्था कडेकोट कऱण्यासाठी अग्निवीर येतील. नोकरीच्या संधी वाढतील. अग्निवीरांना चांगल्या वेतनाची व्यवस्था केली आहे. जीडीपीमध्येही त्यामुळे योगदान होईल आणि देशाला चांगले कौशल्य असलेले लोक मिळतील असंही राजनाथ सिंह म्हणाले.

अग्निपथ योजना काय आहे?

देशातील तरुणांना देशसेवा करण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे. या योजनेंतर्गत जे तरुण भरती होणार आहेत त्यांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं असेल. अग्निपथ अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना ४ वर्षासाठी लष्करात सेवा करता येईल. त्यानंतर भविष्यात आणखी संधीही दिली जाईल. चार वर्षाच्या सेवेनंतर तरुणांना निधी पॅकेज मिळेल. या योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना चार वर्षानंतर सेवामुक्त केले जाईल. १७.५ ते २१ वर्षे वयाच्या तरुणांना यामध्ये संधी मिळेल. तसंच यांचे ट्रेनिंग १० आठवडे ते ६ महिन्यांपर्यंत असेल. १० वी, १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल.

या अग्निपथ योजनेची खास वैशिष्ट्ये :-

१) प्रत्येक वर्षी ५० हजार युवकांची भरती होणार व चालू वर्षी ४६ हजार युवकांची भरती केली जाईल.

२) तीन ही सर्व्हिसचे भरती प्रक्रिये प्रमाणे अटी व शर्ती राहतील.

३) सेवाकाल चार वर्षाचा असेल त्यानंतर ज्यांना कायम व्हायचे असेल त्यांनी अर्ज करून सेवा काल कायम करण्याची तरतूद आहे पण किमान १५ वर्ष सेवा करणे अनिवार्य असेल.

४) सेवाकालात दरमहा पहिल्या वर्षी ३०,०००/- दुसऱ्या वर्षी ३३,००९/- तिसऱ्या वर्षी ३६,५००/- व चौथा वर्षी ४०,०००/- पगार असेल त्यातून ७० टक्के रक्कम हातात मिळणार व ३० टक्के रक्कम कॉर्पस फंड म्हणून कापला जाईल व चार वर्षानंतर सेवा निधी म्हणून ११,७१,०००/- रुपये रक्कम एकरकमी मिळतील.

५) ही योजना ९० दिवसाच्या आत सुरू होतील.

६) या चार वर्षाच्या सेवाकल मध्ये या नवयुवकांना विविध प्रकारचे सराव, विविध प्रकारचे अनुभव , शिस्त, विविध प्रकारचे कौशल्य, शरीर सुदृढता, धाडस व लीडरशिप सारखे गुण निर्माण होणार जेणे करून चार वर्षाच्या सेवे नंतर बाहेर येवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे व येताना जे एकरकमी सेवानिधी म्हणून ११ लाख ७१ हजार मिळणार आहेत ते भांडवल म्हणून कामी येतील आणि यातून या अग्निविरांचे योगदान राष्ट्र वाढीसाठी कामाला येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =