You are currently viewing नियोजित मालवण तालुका मत्स्य-शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक पदी श्री. महेंद्र पराडकर यांची निवड

नियोजित मालवण तालुका मत्स्य-शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक पदी श्री. महेंद्र पराडकर यांची निवड

मालवण :

भारत सरकारच्या कृषि व मत्स्यव्यवसाय खात्याच्या शासन निर्णयास अनुसरून महाराष्ट्र राज्य सरकारने निर्गमित केलेल्या परीपत्रकान्वये मालवण तालुका मत्स्य-शेतकरी सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजित संस्थेच्या मुख्य प्रवर्तक पदी श्री. महेंद्र पराडकर यांची एकमताने मिवद करण्यात आली आहे.

नियोजित मालवण तालुका मत्स्य-शेतकरी सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी संस्कार हॉल, मालवण येथे मत्स्यव्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गाबीत समाजाचे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. हरि खोबरेकर, श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप घारे, श्री. बाबी जोगी,मिथुन मालंडकर, नरेश हुले, दादा वाघ, स्वप्नील आचरेकर वगैरे मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.

सदरील संस्थेमध्ये रापण, गिलनेट, ट्रॉलर व्यावसायिक, मच्छी विक्रेत्या महिला, मत्स्य खरेदी विक्रेते व्यापारी वगैरेच्या प्रतिनिधिना प्राधान्य देऊन संस्थेत सहभागी करून घेण्याचे ठरविणेत आले आहे.

अशाप्रकारच्या तालुकास्तरीय मत्स्य शेतकरी सहकारी संस्था देवगड व वेंगुर्ले तालुक्यात सुद्धा स्थापन करण्याचे ठरविणयात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा