You are currently viewing विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

    आपण सर्व लोक एकमेकांवर अवलंबून आहोत. एकमेकांशी सगळे *Connecte आहोत.पण झाल काय आपण Connected असून सुध्दा *Disconnected* झालोय. तिथे अहंकार आला या अहंकारामुळे आपण Disconnected झालोय. हा अहंकारच सगळा नाश करतो. म्हणून इथे पुन्हा कृतज्ञतेचा संबंध येतो. म्हणून *कृतज्ञतेचा वास तेथे अहंकाराचा नाश”* कृतज्ञता जर तुमच्यात वास्तव्य करून राहिली तर अहंकाराचा नाश झालाच पाहिजे. तुम्ही म्हणाल कृतज्ञता अहंकाराचा नाश कसा करील ? तुम्हाला जेव्हा कळेल, जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो, जेव्हा ज्ञान होत तेव्हा “संतांना सगळीकडे मीच दिसतं’ का दिसत ? कारण तोच सर्वांठायी भरलेला आहे हे त्यांना दिसत. *एकच Lifeforce सर्व ठिकाणी भरलेला आहे हे संतांना दिसत. आणि तीच खरी वस्तुस्थिती आहे.* साक्षात्कार झाला म्हणून काळजी करू नका *हे ज्ञान जरी आपल्याला झाल आणि पचवता आल रूजवता आल ना तरी साक्षात्कारात जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला मिळू शकेल हे लक्षात ठेवा.*

*श्री प्रल्हाद (दादा) वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + fourteen =