You are currently viewing आंबोलीत ग्रामस्थांची नाराजी; हायवे प्रशासन करतंय डोळेझाक

आंबोलीत ग्रामस्थांची नाराजी; हायवे प्रशासन करतंय डोळेझाक

सावंतवाडी :

आंबोली पासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर   सावंतवाडी बेळगाव हायवे रस्त्यावर पुल बनत आहे, ह्या पुलावरती अनेक अपघात झाले आहेत. या पुलावरून कितीतरी वाहने पुलाला कठडा नसल्याने खाली कोसळली आहेत.

एक रिक्षा याच पुलावरून कठडा नसल्याने काही वर्षापूर्वी खाली कोसळून रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले व नंतर तेथे कठडा बांधण्यात आला.

परंतु दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूचा कठाडा नसल्याने कित्येक वाहने खाली कोसळली आहेत. त्यावर उपाय म्हणून हायवे प्रशासनाने रस्त्यावरती डांबराची खाली बॅरल लावले आहेत जणू काही दीपावलीला आकाश कंदील लावल्यासारखे झाले. या आधीच पूल अरुंद असल्याने व त्यावर बॅरल लावल्यामुळे रस्ता आणखीनच अरुंद बनला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या पादचार्‍यांना जिव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हायवे प्रशासन असे कित्येक बळी गेल्यावर व किती वर्षानंतर जागे होणार व पुलाला कठाडा बांधणार आहेत, असे ग्रामस्थांमधून बोलताना ऐकण्यात येत आहे.

राजा महाराजांचा वारसा लाभलेल्या व देवदेवतांचा इतिहास असलेल्या या आंबोली पुण्य भूमीत हायवे प्रशासन डोळेझाक पणा करीत असल्याने आंबोलीतील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा