You are currently viewing मोती तलावाकाठचे खचलेले फुटपाथ दुरुस्त करा, अन्यथा वृक्षारोपण करू…पुंडलिक दळवी

मोती तलावाकाठचे खचलेले फुटपाथ दुरुस्त करा, अन्यथा वृक्षारोपण करू…पुंडलिक दळवी

अपघात घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार…

सावंतवाडी

मोती तलावाच्या काठावर असलेले फुटपाथ धोकादायक बनले आहे. ठीक-ठिकाणी ते खचले आहे. त्यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा राष्ट्रवादी त्या ठिकाणी वृक्षारोपण करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी आमचे लक्ष वेधले, असे त्यांचे म्हणणे असून आठवडा बाजार तसेच अन्य वेळी त्याठिकाणी एखादा अपघात घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, यात असे म्हटले आहे की, मोती तलावाच्या काठावर असलेले फूटपाथ धोकादायक बनलेले आहे. अनेक ठीकाणी खचले असून खोल खड्डे पडले आहेत.त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो अशा तक्रारी ज्येष्ठ नागरिकांनी व अनेक लोकांनी आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ भूमिका घ्यावी,सद्यस्थितीत त्याच ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. त्यामुळे फूटपाथचे काम तात्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे.

गाळ काढताना तीन मुशी परिसरातील फुटपाथ खचला आहे. त्या ठिकाणी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील,असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा