You are currently viewing १६ नोव्हेंबरला वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

१६ नोव्हेंबरला वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १६ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी, खणा नारळाने ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मुझे माडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवदर्शन व नाट्य रसिकांना जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक ग्रामस्थ व वाफोली हितवर्धक संस्था मुंबई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा