You are currently viewing भूतछाया

भूतछाया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*

*भूतछाया*
*वृत्त—मंजुघोषा(गा ल गा गा x३)*

तोडले मी पाश माझे शृंखला या
मोहमाया वासना ती बंधकाया

मांडलेला खेळ जो मी मोडलेला
जोडण्याचा यत्न जाई वेळ वाया

मागुनी जे बोलती ते बोलघेवे
तुच्छतेने त्यांस बोले टाकुनीया

प्रेम माझे आटले ते त्या किनारी
मीच होतो पैलतीरी सोडवाया

श्वास माझा कोंडतो गर्दीमधूनी
एकटा ये वृक्षराजी शांतवाया

आप्त नाती मित्र सारे स्वार्थ भारे
दूर केले तात माता पुत्र जाया

नांदतो मी या इथे आता सुखाने
आठवांनो चालते व्हा *भूतछाया*

—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eight =