You are currently viewing आ. वैभव नाईक यांची कुडाळ येथील जीवनविद्या मिशनच्या मेळाव्याला उपस्थिती

आ. वैभव नाईक यांची कुडाळ येथील जीवनविद्या मिशनच्या मेळाव्याला उपस्थिती

*श्री. प्रल्हाद पै यांचे घेतले आशीर्वाद*

 

कुडाळ :

सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांचे सुपुत्र जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृह येथे नामधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री. प्रल्हाद पै यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. जीवनविद्या मिशनच्या वतीने देखील आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मेळाव्याचा शुभारंभ दिपप्रज्वलन व सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी श्री. प्रल्हाद पै. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जीवनविद्या मिशन शाखांमधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी व हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =