You are currently viewing कासार्डे शिक्षण संस्थेचे सरचिटणीस उपेंद्र पाताडे यांचे निधन

कासार्डे शिक्षण संस्थेचे सरचिटणीस उपेंद्र पाताडे यांचे निधन

तळेरे: प्रतिनिधी

कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सरचिटणीस उपेंद्र सहदेव पाताडे( वय 61वर्षे) यांचे मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले आहे.ते कासार्डे बंडवाडी येथील मुळ रहिवासी होते. कासार्डे विकास मंडळ, मुंबई शिक्षण संस्थेचे गेली ७ वर्षे सरचिटणीस पदावर त्यांनी व्यवस्थित कामगिरी पार पाडलीआहे. त्यांच्या निधनाने कासार्डे विकास मंडळ या शिक्षण संस्थेचे मोठी हानी झाली आहे.
निधनाची बातमी समजताच कासार्डे माध्यमिक ,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगी व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + fifteen =