You are currently viewing कणकवली तरंदळे येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना भात बियाणेचे वाटप

कणकवली तरंदळे येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना भात बियाणेचे वाटप

कणकवली

कणकवली तालुक्यातील तरंदळे शिवसेना यांच्या सौजन्याने भात बियाण्यांचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच उद्योजक रामू विखाळे, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग नाईक, रमाकांत देवळेकर, तेजस सावंत, अनिल कदम, सतिश कदम, शाखाप्रमुख अमोल परब, घाडीगावकर, अजित सावंत उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा