You are currently viewing वैभववाडीत वीज वाहिन्यांवरील झाडीझुडपे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

वैभववाडीत वीज वाहिन्यांवरील झाडीझुडपे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

सेक्शन एक मध्ये वीज वितरणची मोहीम

वैभववाडी

वैभववाडी वीज वितरण कंपनीकडून वीज खांब व वाहीन्यावरील झाडे-झुडपे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सेक्शन एक मधील गावात ठिकठिकाणी वाहिन्यांवरील झाडी कर्मचारी व कामगार तोडून बाजूला करत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची मोहीम वीज वितरणने घेतली आहे. लवकरच सेक्शन दोन व तीन मधीलही वाहिन्यांवरील झाडाझुडपांची सफाई केली जाईल अशी माहिती वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सेक्शन एक मध्ये नाधवडे, कोकिसरे, नापने, करूळ, कुंभवडे व इतर गावे येतात. तरळे – गगनबावडा हा राष्ट्रीय महामार्ग यातील काही गावातून जातो. तसेच इतर प्रमुख मार्ग ही गावातून जातात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पावसाळ्यात वारंवार वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित होत असतो. तसेच रस्त्यावर पडलेल्या वाहिन्यांमुळे अपघाताची शक्यता अधिक असते. संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणकडून झाडी तोडण्याचे काम हाती घेतले आहे. वस्ती लगत असलेली झाडे, रस्त्यालगत असलेली झाडे तात्काळ बाजूला केली जात आहेत. सेक्शन एक चे शाखा अभियंता श्री कानडे, वायरमन व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. धोकादायक झाडांची छाटणी होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा