You are currently viewing नातं नातं

नातं नातं

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

माणूस समाजप्रिय समुदाय मध्ये राहणारा प्राणी आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या नात्यात अडकलेला असतो. आपणं आपल्या नात्यामुळे एकामेकात अडकून आहोत . पती पत्नी. मुलगा मुलगी. आई वडील. आजी आजोबा. सासू सून. मित्र सोयरे. अश्या विविध रक्ताच्या व मैत्रीच्या नात्याने संबंध दृढ होतात.
आपल्या नात्यात चांगलें वाईट क्षण येतात. त्याला आपणच आणि आपले तोंड जबाबदार असतें. आपल्या तोंडावर बोलण्यावर नियंत्रण असण गरजेच आहे. कारणं प्रत्येक कुटुंबात. मैत्रीत आपल्या काही वागण्यामुळे त्यात अंतर येते. त्यासाठी आपणं कस वागल पाहिजे याचे ज्ञान आपणास गरजेचे आहे. आग पाणी होणे गरजेचे आहे असा निसर्ग नियम सांगतो .
पती पत्नी यांनी आपले जीवन सुखकर होण्यासाठी कस वागल पाहिजे कस वागावे
** जोडीदाराचा मनापासून स्विकार करा
**;एकामेकाशी स्पर्धा करण एकामेकाची कुचेष्टा करू नका
** एकामेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा
** जोडीदाराने बदलायलाच हवं असा आग्रह धरू नका
** जोडीदाराला क्वालिटी टाईम द्या
** जोडीदाराचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस कधीही विसरू नका
** एकामेकाला पुरेशी स्पेस द्या
** एकामेकाना गृहित धरु नका
** सतत चुका न दाखवता क्षमा करण्याचा मोठेपणा जपा
** परस्परांच्या नात्यावर आक्रमण करु नका या ठराविक गोष्टीचा अवलंब केल्याशिवाय संसार जीवन सुखी आणि समाधानी होणार नाही
## मुलगा आणि मुलगी व यांनी कश्याप्रकारे आपल्या मुलांना समजावले पाहिजे कस वागवलं पाहिजे
** मुलगा मुलगी लहान असेल तेव्हा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वागणूकीत शिक्षा करणं गरजेचं आहे
** लाड प्रेम माया यांचा वेळेनुसार अवलंब केला पाहिजे
** आपणं जिथ काम करतो तिथे मुलांना घेऊन जाणे गरजेचे आहे कारणं त्याशिवाय आपणं पैसा कसा मिळवावा आणि कसा खर्च करावा पैसा मिळविण्यासाठी काय कष्ट करावे लागतात याची जाणीव मुलांना होणार आहे
** तरुण वयात मुलगा मुलगी यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना मित्र म्हणून समजून घेणे समाजात लोकांमध्ये चांगले वाईट काय याची समज विश्वात घेऊन देणें गरजेचे आहे
** मुलगा मुलगी बाबतीत ठराविक गोष्टीत असूदे त्याला काय होतंय हा पवित्रा बदलणं गरजेचं आहे
** वडीलांनी दारु सिगारेट गुटखा .अफू चरस गांजा अशी व्यसने मुल मुली देखत करु नये
** शिव्या देणं भांडण . घरातील व्यक्तिला म्हणजे आई वडील पत्नी यांच्या माराहान शिवीगाळ करू नये यामुळेच मुलांवर तसेच संस्कार घडतील आणि मुलं मुली हातची निघून जातील
** घरातील वातावरण मुलांना मुलींना एकल बनवते आणि त्यामुळे मुल मुली बाहेरचे वेगवेगळ्या नादाला अमिषाला बळी पडतात आणि आपलं जीवन खराब करून घेतात
** परस्थिती बघून मुलांना मुलींना वागण्याचा सल्ला द्या
आपल्या मुलांना मुलींना या गोष्टी शिकविण्यासाठी शिकवणी लावण्याची गरज नाही कारणं आपल्याला संस्कार शिकविणारी आपली पहिली गुरु असतें ते म्हणजे आई सर्वात श्रेष्ठ असतें . शंभर मुल असूनसुद्धा मुलांची वागणूक चांगली नसेल तर एकच मुलगा चांगला
## ‌ कामगार आणि ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार यांनी कस वागल पाहिजे
** कामगारांचा कामांवर अपमान करु नये
** कामगार व्यसनी असेल तर त्याला व्यसनमुक्ती साठी सल्ला द्या
** कामगारांना रास्त पगार द्या
** कामगारांची उचल हजेरी पत्रक इत्यादी लेखी स्वरूपात ठेवा
** कामगारांना सर्व शासकीय निमशासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे विनामूल्य द्या
** कामगारांना विहित वेळेपेक्षा कमी पगाराने कोणी काम करुन घेत असलतर त्याची स़ंबधित पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा
** उचल लेखी नसेल तर कामगारांना कोणताही ठेकेदार इंजिनिअर कंत्राटदार पैश्याची मागणी करु शकत नाही असं केल्यास त्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात यावा
** कामगारांचे कामांचे पैसे अथवा मजूरी कोणी बुडवणयाचा प्रयत्न करत असेल कामगारांना दम देणें शिवीगाळ करणे अश्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी
** कामगारांना कामांत मजूरी नाही भागीदारी द्या
अश्या प्रकारे कामगारांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यासाठी कोणी अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करा
## रेशन दुकानदार आणि रेशन ग्राहक
** रेशन दुकानदार यांनी आपल्या दुकानाचे नाव. रजिस्टर नंबर. धान्याची आवक जावक. विविध रेशनकार्ड वर्गवारी नुसार कार्ड संख्या रेशन दुकान फलकांवर लावणे गरजेचे आहे
** रेशन दुकान वेळेवर उघडणे
** रेशन युनिट प्रमाणे वाटप करणे
** रेशन दुकानात तक्रार पुस्तक उपलब्ध करून देणे
** महिन्याच्या महिन्याला धान्य वितरण करणे . एखाद्या महिन्याला रेशन ग्राहकाने काही कारणास्तव रेशन घेतल नाही तर ते रेशन बुडत नाही पुढील महिन्यात देण रेशन दुकानदार यांना बंधनकारक आहे
** रेशन दुकान विविध सेवा संस्था बचत गट यांनाच मिळाले आहे कां
** रेशन दक्षता समिती वर्षाला बदलली जाते कां? त्यात सर्वसामान्य लोकांमधील महिला पुरुष सभासद् घेतलें आहेत कां ?
** रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी व कर्मचारी आणि गोदाम निरिक्षक. वाहतूक करणारे यांचें काय लागेबांधे आहेत कां ?
** अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम आपल्या गावात राबविण्यात आली कां ?
** रेशनकार्ड सदन आणि दुर्बल आर्थिक सर्वे २००५ पासून आजपर्यंत झाला कां ?
अश्या विविध माध्यमातून रेशन दुकानदार आणि रेशन ग्राहक यांचें नाते व्यवस्थित आहे कां
## डॉ आणि मेडिकल व पेशंट
** माणूस आहे म्हणजे आजार आहे त्यासाठी आपल्या गावात असणारे डॉ काय दर्जाचे आहे म्हणजे त्यांची डिग्री कोणती
** दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली आहे कां?
** दवाखान्यात आजारानुसार उपचार दर निश्चित आहेत कां?
** दवाखाने स्वच्छ साफ सफाई आहे कां.
** दवाखान्यात असणारा स्टाफ पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणूक देतात कां?
** मेडिकल आणि डॉ यांचे सगणमत आणि कमिशन बेसवर औषध घेण व विक्री केली जाते कां?
** विविध टेस्ट करण्यासाठी ओळखीच्या दवाखान्याची चिठ्ठी दिली जाते काय
** एम आय आर. एक्सरे. अश्या महागड्या टेस्ट करण्यासाठी मनमानी दराने पेशंटला लुटलं जात कां?
** बोगस डॉक्टर यांचा आज सुळसुळाट भरपूर झाला आहे तसा कोण आपल्या जवळ आहे कां असेल तर त्याची तक्रार आजचं जवळच्या पोलिस स्टेशनला करा
## जनमाहिती अधिकारी आणि जनता
** सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व विकस भकास या कामांची तपासणी पडताळणी माहिती घेण्यासाठी शासनाने माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर केला पण आज यामध्ये सर्व जनमाहिती अधिकारी पळवाट काढून लोकांना नाहक त्रास देत आहेत
** वैयक्तिक माहिती. त्रेयसत पक्ष. कागदपत्रे सापडतं नाही. अभिलेख गहाळ झाला आहे. माहिती विस्तारित स्वरुपाची आहे. माहिती ३० दिवसांत न देणें. माहिती अधिकार अर्जावर स्टॅम्प नाही. माहिती अधिकार अर्जावर सहि नाही. माहिती अधिकार अर्ज अधिक माहीती मागण्यात आली आहे. जनमाहिती अधिकारी सुनावणीला हजर नाही. अश्या विविध मार्गाने पळवाटा काढून जनमाहीती अधिकारी जनतेला नाहक त्रास देत आहेत यामुळे आज जनता आणि जनमाहीती अधिकारी यांच्या नात्यात कडवटपणा आला आहे
## पोलिस आणि सर्वसामान्य लोक
** लोकांना आपल्यावर होणारा आणि झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी संविधान मध्ये भरघोस अधिकार दिला आहे पण आज प्रशासन नेत्यांच्या खुंटयाला बांधले आहे
** पोलिसांनी तक्रार नोद करण्याअगोदर दोन्ही गटांना समजावून सांगून पुढील होणारी हाणी थांबविण्यासाठी प्रयत्न करावा
** तक्रार नोंद केल्यावर त्या तक्रारींचा तपास करावा
** शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोष व्यक्तिला शिक्षा झाली नाही पाहिजे
** गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीस माराहान करण्याचा पोलिसांना अधिकार नाही
** आरोपीला बारा तासांच्या आत कोर्टा पुढे ऊभे करणे गरजेचे आहे
** अटक करताना आरोपील त्याचा गुन्हा काय अटक कोण करतंय कशासाठी करतय. अटक करताना जवळ कोण आहे. आरोपीला आपले मत मांडण्याची संधी दिली कां. आरोपीला आपल्या बचावासाठी वकील नेमण्यास वेळ दिला कां. महिला आरोपीला अटक करण्यासाठी महिला पोलिस आहे कां. संध्याकाळी महिला आरोपीस अटक करण कायदा बाह्य आहे.
** गाडी पकडली असता पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी कायद्यात तरतूद आहे. ड्युटी वर नसेल तर पोलिस गाडी अडवू शकत नाही कोणाला अटक करू शकत नाही पैश्याची मागणी करु शकत नाही. पोलिसांनी अवैध धंदे.गुंडगिरी दहशतवाद. बाल विवाह . मटका. दारु . असे विविध अवैध धंदे रोखण्यासाठी सदैव तत्पर असावे.
पोलिस आणि जनतेचे नातं नाजुक असतं लोक पोलिसांना आपलं वैरी मानतात तर या पोलिसांना आपले मित्र माणूनच आपल नातं आजचं घट्ट करा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 1 =