You are currently viewing वेंगुर्ल्यात तुळस येथे जैतिर मंदिर भक्त निवासाचे लोकार्पण

वेंगुर्ल्यात तुळस येथे जैतिर मंदिर भक्त निवासाचे लोकार्पण

भक्त निवास इमारतीचे उद्घाटन सोमवारी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते

 

वेंगुर्ले :

तुळस जैतिर देवस्थान येथील मंदिरानजीक भक्त निवास इमारतीचे उद्घाटन सोमवारी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान वेंगुर्ले तुळस येथील श्री देव जैतीर देवस्थानाचे भक्ती निवास भाविकांसाठी सोमवार पासून पुढे करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री असताना १५ लाख रुपयांचा निधी यासाठी दिला होता. सध्या जयंती उत्सव येथे सुरू असून त्याचे औचित्य साधून भक्ती निवासाचा उद्घाटन आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समस्त गावकरी मंडळी, देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार केसरकर यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती यशवंत परब, सरपंच शंकर घारे, उपसरपंच सुनील परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष तथा प्रमुख मानकरी अध्यक्ष अनिल परब सचिव विजय रेडकर, मानकरी बाबा परब, हनुमंत राऊळ, बाबू मेस्त्री, रमाकांत परब, भगवान परब, सुभाष परब, बाबू राऊळ, ग्रा. पं. जयवंत तुळसकर, चंद्रे परब, शेखर तुळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हुबळे, बाळा दळवी जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, समीर शेटकर, गुंडू परब, तुषार राय, माजी सरपंच आपा परब, भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस नारायण कुंभार यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले की, श्रीदेवी जैतीरचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात त्यांची योग्य व्यवस्था होणे गरजेचे असल्याने हे भक्तनिवास या ठिकाणी उभे आहे. या भक्तनिवासाला लागून स्वच्छतागृहासाठी जिल्हा नियोजना मधून निधी देण्यात येईल असे केसरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − one =