You are currently viewing I T अॅक्ट नुसार सायबर सेल फेक अकाउंटची कसून चौकशी करणार…

I T अॅक्ट नुसार सायबर सेल फेक अकाउंटची कसून चौकशी करणार…

मुंबई :

 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी ही माहिती दिली आहे.

 

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांच्या प्रतीमेला  दुषित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर करून मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आलं. याप्रकरणी “आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे,” अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली.

एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल   सीबीआयला दिला. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, “तपासादरम्यान मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्यासाठी आणि दलाची बदनामी करण्यात आली. मात्र एम्सच्या अहवालाचं आश्चर्य वाटलं नाही. कारण आमच्या तपास योग्य दिशेने सुरु होता. सत्य कधी ना कधी समोर येतंच.”

 

सुशांतच्या आत्महत्येनंतर राज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेलने अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी करताना ते दिसून आलं आहे. सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली असून ती बनावट आहेत.

 

याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने या फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे फेक अकाऊंट भारतातील नसून हे इटली, थायलँड, फ्रान्स, इंडोनेशिया, टर्की सारख्या देशातून ऑपरेट केले जात होते. पण सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच १४ जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेली असं अहवाल सांगतो. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे.

 

 

तसेच काही अकाऊंट तर असे आहेत जे २०१० मध्ये तयार केले आहेत. मात्र त्यांना आता ऍक्टिव दाखवण्यात येत आहे. या सर्व अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले.

 

 

मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला. आता IT ऍक्टनुसार सायबर सेल फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आता सायबर सेलने २ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अनेक सोशल मीडियावरील ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांनी यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात IT ऍक्ट अंतर्गत ६७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =