You are currently viewing मुळस ते विजघर रस्त्याच्या कामाला सुरुवात

मुळस ते विजघर रस्त्याच्या कामाला सुरुवात

युवासेना समन्वयक मदन राणे व तेरवण मेढे माजी सरपंच प्रविण गवस यांच्या आक्रमक भुमिकेला यश

दोडामार्ग

मुळस ते विजघर रस्त्याचे काम मंजूर असुन सुद्धा ठेकेदार हा रस्ता करण्यासाठी दिरंगाई करत होता. हा रस्ता वाहतुकीस सुरळीत व्हावा यासाठी युवासेना समन्वयक मदन राणे,व तेरवण मेढे माजी सरपंच प्रविण गवस व ग्रामस्थ यांनी बांधकाम विभागाला घेराव घातला होता. आपण हे काम उद्यापासून सुर करतो असे संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले होते.मात्र ह्या कामाला दुसऱ्यादिवशी पासुन सुरुवात झाल्याने ग्रामस्थ आणि वाहनधारकांनमधुन समाधान व्याक्त होत आहे.


यावेळी युवासेना समन्वयक मदन राणे,तेरवण मेढे माजी सरपंच प्रविण गवस,जिल्हा संघटक संजय गवस,संदेश राणे,आँल्विन लोबो, दत्ताराम तळणकर, दशरथ मोरजकर, प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 5 =