You are currently viewing मालवणात सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी रोटरी क्लब मालवणच्या वतीने सूचना फलक बसविण्याचा उपक्रम

मालवणात सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी रोटरी क्लब मालवणच्या वतीने सूचना फलक बसविण्याचा उपक्रम

मालवण :

मालवण तालुक्यातील सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी रोटरी क्लब मालवणच्या वतीने सूचना फलक बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी मालवण रॉक गार्डन येथे सूचना फलक बसवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

तारकर्ली येथे समुद्र किनारी बोट बुडून अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व किनारपट्टीवर अधिक प्रमाणात उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने पर्यटन स्थळांवर सूचना फलक बसविण्यात बाबत तहसीलदार अजय पाटणे यानी केलेल्या आवाहनानुसार रोटरी क्लबच्या वतीने सूचना फलक बसविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

पर्यटकांनी खोल समुद्रात जाऊ नये. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, यासह तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक या फलकावर देण्यात आले आहेत. मालवण रॉक गार्डन प्रवेशद्वारावर पहिला फलक बसविण्यात आला. तालुक्यातील १२ ठिकाणी हे फलक बसविण्यात येणार आहेत. तर महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी फलक रहावेत. यादृष्टीने कायमस्वरूपी टिकणारा मेटल बोर्ड बसविण्याची कार्यवाही रोटरी क्लबच्या माध्यमातून केली जाईल अशी माहिती रोटरी क्लबचे मालवण अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी दिली आहे.

यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विजय यादव, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, रोटरी क्लबचे हेमेंद्र गोवेकर, सुहास ओरसकर, बाळू तारी, रतन पांगे, संजय गावडे, अभय कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =