You are currently viewing शेतकरी कुटुंबातील कन्या दया पालव ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल; महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनीचे यश

शेतकरी कुटुंबातील कन्या दया पालव ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल; महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनीचे यश

शेतकरी कुटुंबातील कन्या दया पालव ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल; महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनीचे यश

सावंतवाडी

मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील दया पालव हिने महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत ठाणे ग्रामीण पोलीस पदी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दया पालव ही महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी असून, तिने कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील साध्या कुटुंबातून येऊन तिने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस दलात प्रवेश मिळवला.
तिच्या या यशाबद्दल महेंद्रा अकॅडमीच्या शिक्षकवर्गाकडून तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश इतर तरुणींना प्रेरणादायी ठरत आहे.
दया पालव हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा