You are currently viewing शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळा गावडे व त्यांचे पुत्र कौस्तुभ गावडे यांच्यासह प्रमुख समर्थकांना बांधले शिवबंधन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळा गावडे व त्यांचे पुत्र कौस्तुभ गावडे यांच्यासह प्रमुख समर्थकांना बांधले शिवबंधन

मुंबई :

 

चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी अखेर आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळा गावडे व त्यांचे पुत्र कौस्तुभ गावडे यांच्यासह त्यांच्या प्रमुख समर्थकांना शिवबंधन बांधले.

 

तसेच गुलाब गुच्छ देऊन बाळा गावडे व त्यांचा पुत्र कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, योगेश नाईक आदि उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा