You are currently viewing देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार

देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार

 

नवी दिल्ली :

 

देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातील गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. शाळा आणि कोचिंग क्लासेस योग्य त्या खबरदारीसह १५ ऑक्टोबरपासून उघडल्या जाऊ शकतील. मात्र, अंतिम निर्णय प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने तेथील परिस्थितीनुसार घ्यावयाचा आहे. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मात्र या महिन्यात तरी शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही राज्यांची, शाळांची जबाबदारी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जो माध्यान्ह आहार दिला जातो, तो स्वच्छ, सुरक्षित असेल, याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात नमूद करण्यात आले आहे.

पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोज हजर राहावेच लागेल, असे नाही. त्यासाठी हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 15 =