You are currently viewing कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

वृक्षारोपण, विद्यार्थ्यांशी संवाद

 

कुडाळ :

 

“जागतिक पर्यावरण दिनाचे” औचित्य साधून कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत विविध ठिकाणी पर्यावरणाचे महत्त्व विशद करून जनजागृती व्हावी, या उद्देशाने वृक्षारोपण व विद्यार्थ्यांची संवाद साधण्यात आला.

पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडाळ येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणाले, जागतिक पर्यावरण दिन हा जागतिक पातळीवर १९७२ पासून साजरा करण्यात येतो.

यामागील उदात्त हेतू हा की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याला अनुसरून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम हीदेखील “ओन्ली वन अर्थ” अशी आहे.

ते पुढे म्हणाले, हवा प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमान वाढ याला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग वृक्ष लागवड, प्रदूषण कमी करणे या कृतीमधून देणे आवश्यक आहे.

यावेळी विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपण करून रोपे वाटप देखील करण्यात आले. कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे श्री. गोसावी सर श्री. आरोसकर सर, श्री. भोगले सर, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे वनपाल नेरूर, श्री कोळेकर, वनरक्षक सावळा कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 20 =