You are currently viewing कुडाळातील मच्छीमार्केट इमारतीचे काम दर्जेदार व्हावे…

कुडाळातील मच्छीमार्केट इमारतीचे काम दर्जेदार व्हावे…

सावंतवाडीसह वेंगुर्ला मच्छीमार्केटची पाहणी करा; भाजपाची मागणी…

कुडाळ

शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छीमार्केट इमारतीचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे केली आहे.दरम्यान संबंधित प्रशासनाने सावंतवाडीसह वेंगुर्ले येथील मच्छिमार्केट इमारतीची पाहणी करून त्यामधील त्रुटी दूर करून सुसज्ज इमारत उभी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांना दिले आहे.

यावेळी भाजप कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला शहराध्यक्ष सौ ममता धुरी, नगरसेविका सौ प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, एँड. राजीव कुडाळकर ,शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर ,उपाध्यक्ष सतीश कुडाळकर ,महीला उपाध्यक्ष मुक्ती परब, बिजेन्‍द्र यादव,योगेश राऊळ, रेवती राणे, रतिकांत खांडेकर ,बाळा कुडाळकर ,श्री गुरव यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कुडाळ ग्रामपंचायत कालावधीतील बांधण्यात आलेली गळती लागलेली इमारत ,कुडाळ बस स्थानकाला उद्घाटनापूर्वी भिंतीला पडलेल्या तडे, त्यानंतर खूप आंदोलन करून बांधण्यात आलेली तुटपुंजी प्रवासी शेड ,गेली दोन वर्ष डांबरीकरण न झाल्याने चिखलाचं पाणी साचलेलं साम्राज्य ,त्याचबरोबर कोट्यवधी रुपये खर्चून कुडाळ भंगसाळ नदी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागलेली गळती ,नाट्यगृहातील त्रुटी, आणि शासकीय निधीचा अर्थात जनतेच्या पैशाचा चुराडा, अशी परिस्थिती उद्भवू नये व शासनाच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी कुडाळ शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने दर्जेदार नाविन्यपूर्ण मच्छिमार्केट निर्माण व्हावे. अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =