You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात ५ जूनला महाआरोग्य शिबीर

अर्जुन रावराणे विद्यालयात ५ जूनला महाआरोग्य शिबीर

माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे आयोजन

वैभववाडी

व्हिजन मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल कोल्हापूर व अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय आणि जयेंद्र रावराणे इंग्लिश-सेमी इग्लीश स्कुल वैभववाडी यांच्या संयुक्तविद्यमाने ५ जून रोजी महाआरोग्य शिबीर होत आहे. येथील अ. रा. विद्यालयात सकाळी १० ते दु.३ या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तालुक्यासह पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची तपासणी मोफत करण्यासाठी जि.प.चे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर येथील प्रसिद्ध हाॅस्पीटल व्हिजन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल यांच्या माध्यमातून हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरात पोट विकार व शस्त्रक्रिया, आतड्यांचे विकार,एण्डोस्कोपी, नेत्रतपासणी, मुळव्याध, मधुमेह, हद्यविकार, रक्तदाब, श्वसनविकार, किडनी, अस्थिरोग, स्रीरोग आदी महत्त्वाच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास व्हिजन चँरिटेबल ट्रस्टच्या मार्फत सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हिजन चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी उर्फ बाबा घोरपडे व जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा