You are currently viewing 30 ऑक्टोबर रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य कंपनी मोरे यांचा “चामुंडेश्वरी याग” दणदणी नाट्य प्रयोग

30 ऑक्टोबर रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य कंपनी मोरे यांचा “चामुंडेश्वरी याग” दणदणी नाट्य प्रयोग

सावंतवाडी :

 

बीरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम च्या निमित्ताने रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्रो ठीक आठ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्य कंपनी मोरे यांचा चामुंडेश्वरी याग हा दणदणी नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे, तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी दीपावली कार्यक्रम आयोजित करण्यात येतो मात्र गेली दोन वर्ष करोना काळात हा महोत्सव रद्द करण्यात आला होता यावर्षी हा कार्यक्रम धुमधडाक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त रात्रो ठीक आठ वाजता न्यू सबनिस वाडा बिरोडकर टेंब सुवर्ण कॉलनी येथील गार्डनमध्ये महान पौराणिक नाटक सादर होणार आहे. तरी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटी चे‌ संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले, सेक्रेटरी संजीव देसाई, हिंद मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे नेते विशाल परब, सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आदि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + three =