You are currently viewing वाढते परप्रांतीय स्थानिकांना ठरू शकतात घातक…

वाढते परप्रांतीय स्थानिकांना ठरू शकतात घातक…

चिरेखाण कामगाराने केली मोबाईल चोरी

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयांची संख्या दिवसागणिक वाढतंच आहे,त्याना वेळीच वेसण न घातल्यास येण्याऱ्या काळात स्थानिकांना ते घातक ठरू शकतात.साटेली भेडशी या ठिकाणी परप्रांतीय चिरेखाण कामगाराने मोटारसायकलस्वरांचा मोबाईल लंपास केला,त्यांनी मागणी केली असता त्यालाच शिविगाळ केल्याने दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत अजय दळवी यांनी असे म्हटले आहे की, परप्रांतीय हा बाजार झाल्यानंतर दुचाकीने राहत्या घरी सोडावे म्हणून आला असता आपण दुचाकीने चिरेखाण येथे सोडण्यासाठी गेलो असता सदर इसमाने खिशातील मोबाईल हिसकावून घेऊन पळू लागला. त्याचा पाठलाग करुन आपण आपला मोबाईल त्याच्याकडून काढून घेतला. सदर घडलेली घटना त्याच्या मालकाला सांगितल्यानंतर मालकांनी आपल्या कामगाराला जाब विचारण्याऐवजी, तुला काय करायचे ते कर असे उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. सदर परप्रांतीवर गुन्हा दाखल करावा व त्या कामगारांची पोलीस ठाण्यात अगोदर नोंद केलेली आहे का हेही पाहावं अन्यथा मालकवरही कारवाई करावी अशी मागणी अजय दळवी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 14 =