You are currently viewing तर आम्ही कायदा हातात घेऊ, राष्ट्रवादी उप जिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा

तर आम्ही कायदा हातात घेऊ, राष्ट्रवादी उप जिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा

ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

सिंधुदुर्ग

ओसरगाव टोल नाक्याचा मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जर जिल्ह्यातील सरसकट सर्व वाहनांना टोल माफी मिळाली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, महामार्गावरील ओसरगाव टोल नाका येत्या काही दिवसात सुरू होत असल्याची माहिती मिळाली आहे. हा टोल नाका जिल्ह्यातील वाहन धारकांचे शोषण करणारा ठरणार आहे. विशेषतः कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील नागरिकांना डोकेदुखी ठरणार आहे. जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस अशी महत्वाची कार्यालये ही ओरोस येथे आहेत. आणि येथे जाताना ओसरगाव येथील टोल नाका क्रॉस करूनच जावं लागतं. येथे जाणाऱ्या लोकांना सतत टोल भरावा लागणार आहे. हा भुर्दंड त्यांनी सहन का करावा असा प्रश्न पिळणकर यांनी विचारला आहे.

शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात mh 07 पासिंग सोबत मुंबई, कोल्हापूर, ठाणे, गोवा अशा पासिंगच्या स्थानिकांनी घेतलेल्या गाड्या आहेत. स्थानिक पातळीवर पर्यटन व्यवसायात काम करणाऱ्या या गाड्यांनाही या टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय ट्रक आणि डंपर वाहतूक धारकानाही त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वाहनांना सरसकट टोल माफी मिळावी अशी आमची मागणी आहे असेही पिळणकर म्हणाले.

दरम्यान आम्ही सध्या सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत आहोत. परंतु ही बाब शासनाने किंवा महामार्ग फ्राधिकरने ऐकले नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. असा इशारा अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा