You are currently viewing सावंतवाडीत शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानांतर्गत भव्य मेळावा आज

सावंतवाडीत शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानांतर्गत भव्य मेळावा आज

सावंतवाडी:

शिवसंपर्क अभियानांतर्गत आज सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा रवींद्र मंगल कार्यालय येथे दुपारी ३ वाजता भव्य मेळावा खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 ते 28 मे 2022 या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख , खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा मेळावा आज 27 मे 2022 रोजी सावंतवाडी शहरातील रवींद्र मंगल कार्यालय येथे दुपारी.३वाजता. आयोजित करण्यात आला आहे .या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 19 =