You are currently viewing मध्यरात्री भेडशी येथे अज्ञाताकडून दुचाकीची दोन्ही चाके लंपास 

मध्यरात्री भेडशी येथे अज्ञाताकडून दुचाकीची दोन्ही चाके लंपास 

मध्यरात्री भेडशी येथे अज्ञाताकडून दुचाकीची दोन्ही चाके लंपास…

दोडामार्ग

भेडशी थोरले भरड येथे सखाराम सावंत यांच्या मालकिची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी पाठीमागच्या अंगणात लावलेली असताना काही अन्यात चोरट्यांनी त्या दुचाकीची दोन्ही चाके मॅकव्हील सहित चोरल्याची घटना काल मध्यरात्रीच्या वेळी घडली.

या बाबत साविस्तर माहिती अशी की सखाराम सावंत यांनी आपली दुचाकी रोजच्या प्रमाणे आपल्या घराच्या मागच्या अंगणात लावली होती मात्र सकाळी पाहता दुचाकी तेथे दिसली नाही आजूबाजूला शोधाशोध केल्यावर दुचाकी त्यांच्या मागच्याच बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दिसली मात्र तेव्हा दुचाकीची दोन्ही चाके मॅकव्हील सहित गायब असल्याचे त्यांच्या नदर्शनास आले.नंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता.

साटेली – भेडशी गावात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामध्ये रात्रीची पेट्रोल डिझेल चोरी देखील होत असते. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − two =