You are currently viewing अमित शाहांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होतेय याचा विशेष आनंद…

अमित शाहांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होतेय याचा विशेष आनंद…

लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे नाव देशात गाजणार

खासदार राणेंनी व्यक्त केल्या भावना

सिंधुदुर्ग
लाईफटाईम मेडिकल कॉलेज चे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होत असल्याचा विशेष आनंद आहे. सिंधुदुर्गातील या मेडिकल कॉलेज चे नाव देशात होईल.जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं हे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे असल्याचा खुप आनंद होत आहे. अशी भावना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवेची कमतरता असल्याने आणि येथील रुग्णांना बाहेर जावे लागू नये यासाठी मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचे ठरवले आणि आमची एस एस पी एम ही संस्था या मेडिकल कॉलेजचा कामाला लागली आणि अवघ्या ४ वर्षात ते स्वप्न पूर्ण होत आहे. परंतु हे मेडिकल कॉलेज बांधताना अनेक प्रकारचे विरोध झाले. शिवसेनेने तर नारायण राणे बेकायदेशीर काहीतरी करत आहेत अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतु आम्ही सर्व प्रकारची परवानगी घेऊनच काम सुरू केले होते. आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुख सोयी असून, विद्यार्थांना कुठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा