You are currently viewing ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली

ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली

महामार्गाची अनेक कामे प्रलंबित असताना टोलसाठी घाई

वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

कणकवली

राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना टोल नाका मात्र सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग 66 ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयाचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाड्यांना टोल मधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे या टोल वसुलीबाबत सिंधुदुर्ग वासीय पुढची काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − twelve =